Posts

Showing posts from July, 2010

म्हटला तर सगळाच आहे आणि म्हटला तर काहीच नाही

म्हटला तर सगळाच आहे आणि म्हटला तर काहीच नाही हो - नाही चा हिंदोळ्यावर लोम्ब्काल्णाऱ्या लोलकाप्रमाणे प्रकाशशालाकेचा परिवर्तनावर कधी धूसर कधी स्पष्ट कधी अंधुक कधी धुंद ... कधी नाहीनाहीस वाटतानाच अचानक प्रकट होणारं कधी दिसत असतानाच हातातून निसटणार आणि मग एक विषण्णता ..आतून उचंबळून येणारी आसमंत भरून टाकणारी आणि 'स्व' वरच प्रश्नचिन्ह उठविणारी ... उत्तरांची फिकीर कधीच नसते ; त्यांची गती दिशाहीन असते निर्वात पोकळीतील प्राणवायूचा अस्तित्वासारखी असते ती फक्त आंतरिक ओढ ..खेचत घेऊन जाणारी आणि विचार करायलाही अवसर न देणारी आणि मग आपण असेच भारावल्यागत चालत राहतो शून्यातून अपूर्णत्वात आणि अपूर्णत्वातून शून्यात म्हटला तर सगळाच आहे आणि म्हटला तर काहीच नाही...

...

मिटून जातो स्पर्ष तेवा जाणवू लागतो अर्थ अर्थावाचून जगलेलं एक धूसर सत्य वलायंकित धूरामागचा एक आकृतिमय प्रवास संपून गेलेला स्वार्थ आणि भोगलेला त्रास मिटून जातो अर्थ तेव्हा जगलेला एक श्वास अन श्वासागणिक बाहेर पडू पाहणारे निश्वास आविष्काराचा ओढीने तळमळणारा ऱ्हास आणि मनानीच मनाचा चालवलेला दुस्वास मिटून जाते सत्य तेव्हा उरते ती आस जगण्यातच कळलेले जगण्यामागचे भास उराशी कवतालालेले मायेचे पाश आणि पाय मागे ओढू पाहणारे अविश्वास