...
मिटून जातो स्पर्ष तेवा जाणवू लागतो अर्थ
अर्थावाचून जगलेलं एक धूसर सत्य
वलायंकित धूरामागचा एक आकृतिमय प्रवास
संपून गेलेला स्वार्थ आणि भोगलेला त्रास
मिटून जातो अर्थ तेव्हा जगलेला एक श्वास
अन श्वासागणिक बाहेर पडू पाहणारे निश्वास
आविष्काराचा ओढीने तळमळणारा ऱ्हास
आणि मनानीच मनाचा चालवलेला दुस्वास
मिटून जाते सत्य तेव्हा उरते ती आस
जगण्यातच कळलेले जगण्यामागचे भास
उराशी कवतालालेले मायेचे पाश
आणि पाय मागे ओढू पाहणारे अविश्वास
Comments