जगणं
जगणे मुश्कील होते तेव्हाच खरे जगात असते मी
परिस्थितीला अगदी जवळून पाहत असते मी .
माणसामाणसातली नातीही तडकू लागतात जेव्हा
खर्या नात्यातले अर्थ जाणवत असते मी
भूतकाळाची नाळ जेव्हा तोडू पाहते मी
विसरलेल्या आठवणी जागवत असते मी
दुनिया सगळी असते जेव्हा पाठ फिरवून उभी
सोडून दिलेल्या वाटेवरचा अर्थ असते मी
आयुष्याबरोबर जेव्हा फरफटत असते मी
मनापासून सांगते,तेव्हाच खरी जगात असते मी
Comments
i likes.. :D n apan mhanat asto kadhi jagayla milnar!!