म्हटला तर सगळाच आहे आणि म्हटला तर काहीच नाही

म्हटला तर सगळाच आहे आणि म्हटला तर काहीच नाही
हो - नाही चा हिंदोळ्यावर लोम्ब्काल्णाऱ्या लोलकाप्रमाणे
प्रकाशशालाकेचा परिवर्तनावर कधी धूसर कधी स्पष्ट
कधी अंधुक कधी धुंद ...
कधी नाहीनाहीस वाटतानाच अचानक प्रकट होणारं
कधी दिसत असतानाच हातातून निसटणार
आणि मग एक विषण्णता ..आतून उचंबळून येणारी
आसमंत भरून टाकणारी आणि 'स्व' वरच प्रश्नचिन्ह उठविणारी ...
उत्तरांची फिकीर कधीच नसते ; त्यांची गती दिशाहीन असते
निर्वात पोकळीतील प्राणवायूचा अस्तित्वासारखी
असते ती फक्त आंतरिक ओढ ..खेचत घेऊन जाणारी
आणि विचार करायलाही अवसर न देणारी
आणि मग आपण असेच भारावल्यागत चालत राहतो
शून्यातून अपूर्णत्वात आणि अपूर्णत्वातून शून्यात
म्हटला तर सगळाच आहे आणि म्हटला तर काहीच नाही...

Comments

omi said…
व्वा!
xyzandme said…
I was very good at reading marathi back in school..
Marathi being my mother tongue. I feel ashamed :(

Popular posts from this blog

Seasons

Questions again !!